Breaking News
recent

केंद्र सरकारच्या "अग्निपथ"योजनेचा मलकापूर काँग्रेस तर्फे आम्ही जाहीर निषेध

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

हाजी रशीदखान जमादार. दि.२७ /०६/२०२२ला सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय मलकापूर येथे केंद्र सरकारच्या आयोजित अग्निपथ योजनेचा जाहीर निषेध करून  धरणे आंदोलन करण्यात आले.भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच "अग्निपथ" योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून संपूर्ण देशभर अग्निपथाच्या विरोधात आंदोलने होत आहेत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून या  पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून व मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. राजेश एकडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक २७ जून २०२२ ला मलकापूर तहसील कार्यालय येथे शांततेच्या मार्गाने 'धरणे आंदोलन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी हाजी रशीदखान जमादार यांनीआपल्या भाषणातून केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेवर सडाडून टिका केली व जाहीर निषेध केला.मलकापूर तहसीलचे  तहसिलदार सुरडकर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित डॉ.अरविंद कोलते, हाजी रशीदखा जमादार,सोपानराव शेलकर,अँड. हरीशभाऊ रावळ, राजूभाऊ पाटील, सौ. मंगलाताई पाटील,मनोज भाऊ देशमुख, बंडूभाऊ चौधरी,शिरिषभाऊ डोरले, अँड. संजय वानखडे, दिलीप गोळीवाले ,तुषारभाऊ पाटील, अनिल गांधी,अशोक मराठे,सुदर्शन वनारे, कैलास काळे, मनोहरराव पाटील, अश्रफ खान  फिरोज खान, अनंत तायडे,  साजिद अहमद खान, प्रशांत नाफडे, सुधीरभाऊ पाचपांडे, राजूभाऊ जवरे, अनिल मुंधोकार, युसुफ खान, उस्मान खान, रउफ सेठ बागबान, असगर जमदार, ज्ञानदेव तायडे, उखर्डा तांदूळकर, उस्मान मास्टर, विनय काळे, गजानन तायडे, अजमद जमादार, रईस जमादार, अनिल भारंबे, निवृत्ती तांबे, निलेश बोरसे, निलेश झांबरे, प्रवीणभाऊ क्षिरसागर , गोविंदा राहाटे, तुकाराम काशीराम, भूषण सनिसे, डाँ.सय्यद मेहमूद,किसन पाटील, सिद्धांत अनिल इंगळे, पांडुरंग चोपडे, जावेद खान इरफान खान, राजू उखर्डे,नाजुभाऊ यांच्या सह आदी मान्यवरांच्या स्वाक्षरीने  निवेदन सादर करण्यात आले.

Powered by Blogger.