लोणार येथील धारातीर्थ अद्यापही क्लॉक पर्यटकांसाठी खुले करण्याची होते माघनी
मेहकर ता प्रतिनिधी,शिवशंकर मगर
सर्व भारतभर कोविड निर्बंध काढले आहेत त्याच धर्तीवर 1 मे महाराष्ट्र दिनी जर भारतीय पुरातत्व विभागाने प्राचीन लोणार धारातीर्थी येथील पवित्र स्नान पूर्वी प्रमाणे चालू केले नाहीत तर सकाळी ठीक 10 वाजता समस्त 'मी लोणारकर' टीम लोणारवासी व पर्यटक शांततेत स्नान करणार व सर्वांसाठी धार खुली करणार. आपला सहभाग असावा करीत आवाहन मी लोणार कर टीमचे सदस्य प्रकाश सानप, सचिन कापुरे, विलास जाधव, अरुण मापारी, रवींद्र तायडे, तसेच श्याम राऊत, वसंता जावळे यांनी लोणार धारातीर्थ हे भाविकांच्या पवित्र स्नाना साठी खुले करावे अशी विनंती केली.
अन्यथा येत्या रविवारी दिनांक 1 मे 2022 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून लोणार येथील भाविक अत्यंत नम्रपणे व शांततेने गायमुख या ठिकाणी सामूहिक पवित्र स्नान पार पडतील असे निवेदन भारतीय पुरातत्व विभाग नागपूर यांना मार्फत - वरिष्ठ संरक्षन सहाय्यक लोणार येथील एम. टी. एस. किरण प्यारेलाल भगत यांना देण्यात आले यावेळी वरिष्ठ संरक्षण सहाय्यक श्री सचिन कौशिक यांच्याशी 'मी लोणारकर' टीम सदस्य सचिन कापुरे सोबत गायमुख स्नान लवकरात लवकर चालू होणे बाबत फोनवरून चर्चा करण्यात आली व लवकरच चालू होईल असे यावेळी त्यांनी सांगितले. 'मी लोणारकर' टीमने माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसील कार्यालय लोणार यांना पुढील कार्यवाहीसाठी सविनय निवेदन सादर केले आहे.