विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी’दामिनी ॲप वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन
सागर वानखेडे प्रतिनिधी बुलढाणा
मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणारआहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी , कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदरचे अॅप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.
गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे .