Breaking News
recent

संत ज्ञानेश्वर नगर येथील 27 वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


 मलकापूर:- शहरातील संत ज्ञानेश्वर नगर येथील 27 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, आज दिनांक 16 जुन रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की नितीन शंकर रायपुरे वय सत्तावीस वर्ष राहणार संत ज्ञानेश्वर नगर यांनी राहत्या घरात लहान मुलाच्या झोक्याच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती नगरवासीयांना कळतात त्यांनी नितीन ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरने वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून शरीर शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे पाठवण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. महाजन करीत आहे. नितीन मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने या घटनेने परिसरात शोकाकुळ पसरला, नितीन च्या पश्चात त्याची आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार आहे.

Powered by Blogger.