Breaking News
recent

श्रीक्षेत्र पळशी सुपो गावच्या भूमिपुत्राच्या गगनभरारी...!



सागर झनके प्रतिनिधी

  जळगांव जा. तालुक्यातील पळशी सुपो गावचा सुपुत्र रोशन गजानन कोकाटे हा वयाच्या २१व्या वर्षी सनदी लेखपाल म्हणजेच CA(चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे पिंपळगाव काळे ग्रामपंचायत च्या वतीने रोशन व त्यांच्या आई वडील यांचा सत्कार 25 जुलै रोजी करण्यात आला.

   यावेळी या कार्यक्रमाला मा. जि प अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी जि.प.सदस्या पुजाताई पाटील, सरपंच प्रितीताई तायडे,उपसरपंच भारतीताई बांगर,वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, नवलसिंग मावळे, शे हारुन अतार, नवल गोतरकर,अशोक ढोले, आशाताई कळसकार ,यशोदाताई घटे ,वंदनाताई निकम, उषाताई चोखंडे, महादेव घुटे, विनायक पाटील ,श्रीकृष्ण वानखडे, हरीदास वाघमारे ,सुपडा पाटील ,मनु पाटील, अमोल बांगर ,सुभाष पाटील, सुनिल काकडे, बंटी कळसकार ,मयुर राऊत, पिंटु भालेराव, किशोर घटे ,उमेश मांडोकर, सुरेश चोखंडे, बालु निकम,महिंद्रा बांगर, गोपाल तायडे,मंगल काकडे, ईत्यादी व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु गौरी प्रकाश पाटील हीने केले.

Powered by Blogger.