विवेकानंद वाचनालयाचे कार्य अभिनंदनीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ कोटेवार यांचे प्रतिपादन
नांदुरा
सकारात्मक विचार जनतेपर्यंत जावे याकरीता विवेकानंद सार्वजनीक वाचनालय ,नांदुरा करीत असलेले कार्य अभिनंदनीय आहे.असे विचार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजाननराव कोटेवार ,वर्धा यांनी दिनांक २९ जुन रोजी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात काढले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ कोटेवार यांचे शाल, श्रीफळ , व पुष्पगुच्छ देऊन वाचनालयाचे अध्यक्ष संजयराव नेमाडे यांनी स्वागत केले, बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनंतराव सातव यांचे गजानन डोंगरकार यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
प्रतिकुल परिस्थितीतही वाचनालयाचे कार्य विकासाच्या दिशेने सुरू असुन ,वाचकांचा असलेला प्रतिसाद ही कार्याची पावती आहे ,असे ते म्हणाले.वाचनालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेचे,तसेच वाचनालयाचे वतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती घेतली व कौतुक केले .नांदुरा सारख्या गावामध्ये राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ,कलकत्ता कडुन एकवीस लाख आठ हजार इमारत निधी आणुन चार मजली इमारत बांधल्याबद्दल त्यांनी कौतुक केले
उच्च विद्याविभूषित ग्रंथालय कर्मचारी अनेक वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर काम करीत आहेत त्यांना वेतनश्रेणी लागु करण्यात यावी,सार्वजनिक ग्रंथालयांना अत्यंत तटपुंजे अनुदान मिळते त्यांच्या अनुदानात वाढ करावी ,गेल्या १३वर्षांपासून ग्रंथालयांना दर्जा बदल दिल्या जात नाही दर्जा बदल देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने शासनदरबारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.संपुर्ण महाराष्ट्र भर सार्वजनिक ग्रंथालयांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणुन घेऊन शासनदरबारी मांडण्यासाठी त्यांचा दौरा चालु आहे. असा दौरा करणारे ते पहिलेच अध्यक्ष असावेत.
याप्रसंगी ग्रंथपाल सौ वृषाली आडोळकर, लिपिक सौ वर्षा नेमाडे,प्रथमेश आडोळकर,महेश चोपडे व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.