Breaking News
recent

पाणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


 पिंपळखुटा महादेव .दि.१५. दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासाचे सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम  किंवा  अनेक गावे रस्त्याच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहे. त्यादृष्टीने वीविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते ठरवले आहे.पानंद रस्ता योजने अंतर्गत पि. खुटा महादेव ते गट न.९३ रस्ता खडीकरण करण्यात आले. परंतु काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. अंदाज पत्रका नुसार ५०% दर्जाचे सुदा रस्त्याचे काम झालेले नाही.



    त्यामध्ये भरपूर प्रमाणात पिवळ्या मातीचा वापर करण्यात आला. या बाबत रस्त्याचे काम चालू असतानाचे फोटो आणि व्हिडिओ शाखा प्रबंधक मोरे व कार्यकारी अभियंता बुलढाणा यांना व्हाट्सअप केले व फोन करून संपूर्ण माहिती दिली आणि ०१/०४/२०२२ रोजी चौकशीचा तक्रार अर्ज पण दिला आणि आपले सरकार पोर्टल वरती २०/०५/२०२२ रोजी ऑनलाइन तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची साधी दखल घेण्यात आली नाही. यावरून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा दिसून येतो. तसेच कंत्राटदार आणि शाखा प्रबंधक जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांची साथ गाठ आहे कि काय? म्हणून शेवटचा पर्याय म्हणून तक्रार सादर करीत आहे असे वीजयसिंग चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले असून येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा तक्रारीत दिला आहे.

Powered by Blogger.