Breaking News
recent

सामान्य कुटुंबातील मुलगा बनला ' मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी


प्रमोद हिवराळे प्रतींनिधी 

    नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवाशी स्व. सरदारसिंग शिवलालसिंग जाधव यांचे पुत्र दिपक सरदारसिंग जाधव यांची मुंबई मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी वर्ग - २ या पदावर नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेव्दारे उत्तीर्ण होऊन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. दिपक हा बालपणापासून शिक्षणात हुशार होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे टाकरखेड येथे तर पुढील शिक्षण बुलडाणा येथे पार पडले असून त्यांच्या नियुक्तीमुळे टाकरखेड गावाचेच नव्हे तर बुलडाणा जिल्हयाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वच स्तरा मधून त्याचे कौतुक होत आहे. टाकरखेडवासीयांसाठी त्यांची ही नियुक्ती अभिमानाची बाब ठरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Powered by Blogger.