कै. शिवाजी परसराम दरेकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमीत्त वझर सरकटे येथे विविध झाडांच्या रोपांचे वाटप
ता.प्र.शिवाजी खंदारे
मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील कै. शिवाजी परसराम दरेकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमीत्त, दैनिक बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांनी आपल्या वझर सरकटे गावात प्रत्येक घरोघरी झाडांची रोपे देउन आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.
'जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' अभंगात वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे, वृक्ष हे परोपकारी असुन त्यांचे मानवावर अनंत उपकार आहेत. त्यांचे संगोपन केल्यास जागतिक महामारी मध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजन चा तुटवडा पुन्हा होणार नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
तसेच पर्यावरण संतुलन,वृक्ष लागवड,व संवर्धन करणे याबाबत भावी पिढीमध्ये आवड व रुची निर्माण व्हावी या उद्देशाने प्रथम पुण्यतिथी निमित्ताने हा अभिनव उपक्रम राबविला असुन झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी त्या त्या व्यक्ती कडे देण्यात येणार आहे. असे दैनिक बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर यांनी दैनिक अहिल्याराज शी बोलताना सांगितले. या पुण्यतिथी निमित्ताने गावातील प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ति एक वृक्ष याप्रमाणे २०० हुन अधिक व्यक्तींना लिंबुनी,कढीपत्ता, सिताफळ, मोगरा, पेरू, आंबा, जांभुळ, आदि फळझाडे,व शोभिवंत झाडाचे वाटप करण्यात आले. या वेळी विष्णु शिंदे, दत्ता शिंदे, परसराम शिवाजी दरेकर, रामेश्वर शिवाजी दरेकर, सिमा दरेकर, विश्वजीत दरेकर, शंकर मुसळे, प्रभावती नारायण दरेकर, सुमन शिवाजी दरेकर, बेसकर राजू, रेणुका परमेश्वर दरेकर, छत्रपती मुसळे, आदि नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.