Breaking News
recent

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल योजनेचा शुभारंभ

 


सोमनाथ मानकर 

        श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ९ कोटी 23 लाख रुपये जल योजनेचा शुभारंभ करण्यात आला  शुभारंभ प्रसंगी अनेक पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत चा टोल नाका याठिकाणी माननीय गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर श्रीफळ फोडुन  शुभारंभ करण्यात आला गुलाबराव पाटील यांनी आई सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये अभिषेक करून  रोपे  वे ट्राली या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता  

    या सत्कार समारंभासाठी रोपे ट्रॉली चे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कळवण तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी माननीय आलेल्या मान्य मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी असे सांगितले की गेल्या कित्येक वर्षापासून मी आई सप्तशृंगी च्या दर्शनासाठी पायी येत आहे आत्तापर्यंत मी 700 वेळेस कमीत कमी आई भगवतीचे दर्शन घेतले असेल मी कधीही नवरात्राची सप्तमी चुकवत नाही मला आई भगवतीच्या आशीर्वादाने आज आतापर्यंत सर्व पदे मिळाली आहेत तसेच श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील कुठल्या  हि ग्रामस्थला  कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास नक्की संपर्क साधा तुमचे सर्व कामे लवकर पूर्ण होतील असे मी आज आपणास शब्द देतो तसेच कळवण तालुक्यामध्ये    नितीन पवार सारखे आपल्याला आमदार लाभल्यामुळे आपल्या तालुक्याचा सुद्धा लवकरच विकास होईल असे यावेळी सांगितले.

     तसेच श्री क्षेत्र सप्तशृंगी  गडावरील ग्रामस्थ यांनी माननीय गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले की शिवालय तलाव परिसरामध्ये बस स्टॅन्ड करावे म्हणजे श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती भावीक फिरतील  व  व्यवसाय मध्ये थोडाफार फायदा ग्रामस्थ याना होईल  कारण बस स्टँड हे गावाच्या बाहेर आहे रोपवे ट्राली मुळे गावांमध्ये कुठलाही भावीक  फिरत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे  जर शिवालय तलाव परिसरांमध्ये बस स्टॅन्ड झाले तर गडावर सर्व गावात भाविक फिरतील व ग्रामस्थांचे फायदा होईल तसेच गडावरील युवा सेनेचे पदाधिकारी यांनी गुलाबराव पाटील यांना गदा भेट देऊन सत्कार केला यावेळेस याठिकाणी उपस्थित होते आमदार नितीन पवार आ. दराडे तहसीलदार तलाठी नांदूरी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक विश्वस्त पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व कळवण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व गडावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



Powered by Blogger.