Breaking News
recent

अक्षर साधना साहित्य संघाद्वारे प्राचार्य डोंगरदिवे व प्राचार्य मेतकर यांचा सत्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी

     अक्षर साधना साहित्य संघाच्या वतीने सेवा निवृत्त प्राचार्य विजय कुमार डोंगरदिवे व प्राचार्य आर. सी. मेतकर सर यांचा सत्कार सोहळा स्थानिक तारा विश्रामगृह येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी.ए.खरात तर प्रमुख अतिथी  प्रा . डॉ. राऊत  व  आयु .एन.  के सरदार ( सिव्हील इंजिनिअर ) हे उपस्थित होते. 

    सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अँड.  बाळासाहेब वानखेडे यांनी केले. विजयकुमार डोंगरदिवे  यांचा उत्कृष्ट साहित्य रसिक म्हणून अक्षर साधना साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. खरात सरांचे हस्ते तर प्राचार्य आर. सी. मेतकर यांना दि बेस्ट लिटररी फ्लेअर अवार्ड देऊन अक्षर साधना साहित्य संघाचे सचिव हि.रा. गवई यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर शाहीर बापू लंबे यांच्या हस्ते डॉ. सुभाष राऊत यांना सन्मानित करण्यात आले.गौरवपत्र,स्मृतीचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या सहृदय सत्कार समारंभा निमित्त प्रा.राऊत,शाहीर बापू लंबे, मिलिंद भंडारे यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. 

    तर सत्काराला भावनीक उत्तर माजी प्राचार्य डोंगरदिवे व प्राचार्य मेतकर यांनी दिले.या सत्कार सोहळ्यास शाहीर बापु लंबे, भारत जाधव (उपाध्यक्ष अक्षर साधना साहित्य संघ), एस. एस. गवई, अँड. बाळासाहेब वानखेडे (सल्लागार अक्षर साधना साहित्य संघ), हि. रा. गवई (सचिव अक्षर साधना साहित्य संघ), मिलिंद भंडारे, इंजि. एन. के. सरदार, प्रशांतकुमार डोंगरदिवे (कोषाध्यक्ष अक्षर साधना साहित्य संघ), राहुल तुपसौंदर, प्रवीण खरात,विणकर सर यांची उपस्थिती होती. अक्षर साधना साहित्य संघाची कार्यपद्धती व भविष्यातील भूमिका  यावर अभ्यासपूर्ण विवेचन थोर साहित्यिक अक्षर साधना साहित्य संघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.ए. खरात यांनी केले

               कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन प्रशांतकुमार डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन हि. रा. गवई यांनी केले.

Powered by Blogger.