पोटळी येथे २२ वर्षीय युवकांची गळफास घेऊन आत्महत्या
मलकापूर नागेश सुरंगे
नांदुरा तालुक्यातील पोटळी येथील 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोटळी येथील सचिन रमेश सपकाळ हा 22 वर्षे युवक घरून निघून गेला सदर युवकांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता पोटळी शिवारातील गट क्रमांक 230 मध्ये विहिरीच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन मृत अवस्थेत लटकलेला दिसून आला .
मृतांच्या वडिलांनी शेतावर बँकेकडून कर्ज घेतलेले असून कर्जापाइच युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद नांदुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे सदर युवकांने आत्महत्या केल्याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असल्याची माहिती 21 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.