Breaking News
recent

बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे सोने चोरणाऱ्या आरोपीला अटक

 


विजय कदम प्रतिनिधी दौंड

  केडगाव चौफुला येथे दिनांक ३१/०७/२०२२ रोजी  फिर्यादी अनुराधा आनंद चांडक रा.पुणे मुळ रा.उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली की मौजे केडगाव गावचे हद्दीत हॉटेल समाधान  समोर श्री विश्व ट्रॅव्हल्स बस नंबर एम एच २४ ए. बी.७५०० मध्ये  फिर्यादी बसलेल्या जागेवरून लेडीज बॅग व त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व कागदपत्रे असे एकूण ११,१३,५००/-  रुपये चा मुद्देमाल चोरीस गेले बाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता.

त्यानंतर यवत गुन्हे  शोध पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून सदर हॉटेलचे सी.सी. टी.व्ही.फुटेज प्राप्त करून त्यातील एका संशयित इसमा विषयी माहिती घेण्यास सुरुवात केली सदरचा संशयित इसम हा धरमपुरी ता.मनावर जि. धार मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती यवत गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार निलेश कदम,गुरुनाथ गायकवाड,पोलीस नाईक अक्षय यादव यांच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्याने वरील पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन वरील संशयित इसमाचा शोध व माहिती घेण्यास सुरुवात केली सलग ७ दिवस खलघाट,धरमपुरी,मनावर,उमरबन, खेरवा मध्यप्रदेश या भागात संशयित इसमाचा शोध घेतला असता सदर इसम खेरवा ता.मनावर जि. धार येथे असल्याची माहिती वरील पोलीस पथकास मिळाल्या नंतर मनावर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अलवा व यवत पोलीस स्टेशन पथकाने इसम इस्माईल बाबू खान वय ३६ रा.धरमपुरी बायपास ता.मनावर जि.धार राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन उमरबन पोलीस चौकी येथे आणून सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल करून गुन्हयातील चोरीस गेलेले १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण किंमत रुपये ९,३६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी दोन दिवस पोलीस कास्टडी रिमांड मंजूर केली असून सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि स्वप्नील लोखंडे, यवत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव,दामोदर होळकर,वसीमोद्दीन शेख अकोला,पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.

Powered by Blogger.