राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलाला रिपेअर करून लाखो रुपयाचा मलिदा लाटणाऱ्या कल्याण टोल कंपनीची मान्यता रद्द करा- प्रभाकर इंगळे
मलकापूर 2/12/22 मलकापूर येथील आयटीआय कॉलेज जवळ सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील जुन्याच पुलाला रिपेअर करून लाखो रुपयाचा मलिदा लाटणाऱ्या कल्याण टोल कंपनीची मान्यता रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करा अशी तक्रार उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रभाकर इंगळे सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती मौजे बेलाड क्र.१ अंतर्गत कल्याण टोल इनट्राफचर कपंनीने आय टी आय कॉलेज जवळ सुरू असलेल्या पुलाचे काम हे जुन्या पुलाची दुरुस्ती करुन हे काम अंदाजपत्रकानुसार नसून जुन्याच पुलाचे काम पूर्ण करण्यात आले त्यामुळे कल्याण टोल इनट्राफचर कपंनीचे लाईसन रद्द करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सदर काम हे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर चालु आहे . या पुलावरती नेहमी जळ वाहणाची वरदळ असते तसेच आयटीआय कॉलेज, सूतगिरणी, व राष्ट्रीय महामार्गावरील असलेली वर्दळ यामुळे जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . सदर पुल हा ४० वर्ष जुना असून तरी तो जुना पुल पाडून नवीन पुल अंदाजपत्रकानुसार बांधण्यात यावा असे न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील प्रभाकर इंगळे सामाजिक कार्यकर्ते, सतीश दांडगे पत्रकार यांनी दिला आहे.