Breaking News
recent

प्रहार च्या वतीने दिव्यांग दिन साजरा

मलकापूर .. जागतिक दिव्यांग दिना निमित्त प्रहार सेवाकार्य आज दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख  अजय टप व जेष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी यांच्या उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिना निमित्त मलकापूर शहरातील रस्तेच्या कडेला असणारे रेल्वे स्टेशन आवारात राहाणारे गोर गरीब गरजूंना खिचडी लाडू वाटप तसेच निवासी मतिमंद/ मूकबधिर विद्यालय येथे फळे बिस्कीट वाटप करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला .


तसेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापण झाल्याबद्दल तहसील चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमूख शालिकराम पाटील तालुका प्रमूख अजित फुंदे तालुका अपंग क्रांतीचे राहुल तायडे व शुभांगी डवले बलराम बावस्कर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश फिरके हरणखेड अमोल पाटील अशोक गाढवे शितल जांगडे संजय इंगळे विजयराव भगत वसीम भाई हजर होते

Powered by Blogger.