Breaking News
recent

महावितरण ला निवेदन राष्ट्रीय बजरंग दल चा शेतकऱ्यांसोबत उपोषणाचा इशारा.

 


  तालुक्यातील हनवतखेड गावठाण ची डीपीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे तक्रार देऊन सुद्धा महावितरण  चे अधिकारी दखल घेत नाही त्या साठी आता शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय बजरंग दल शाखेच्या वतीने महावितरण कार्यालय मोताळा येथे निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. विदर्भ प्रांतमंत्री जीवनसिंग राजपूत यांनी महावितरण अधिकारी यांच्यासोबत फोन द्वारे चर्चा केली व व निवेदनाची दखल न घेतल्यास राष्ट्रीय बजरंग दल शेतकऱ्यांना घेऊन कार्यालयासमोर उपोषणाला बसेल.असा इशारा देण्यात आला

त्यावेळी ईश्वरसिग राजपूत(राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष) संदीप राजपूत तालुका उपाध्यक्ष सतिश चव्हाण विठ्ठल देवरे पुजाजी पाटील आधारसिग राजपूत  कुलदिप जाधव शाखाप्रमुख निलेश उमाळे उपस्थित होते

Powered by Blogger.