पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविक भक्तांना संत निरंकारी मंडळाकडून तीन दिवस विशेष मेजवानी
पंढरपूर(प्रतिनिधी)
सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने सोलापूर झोनच्या वतीने झोनल प्रमुख श्री इंद्रपाल सिंह नागपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या निमित्ताने संत निरंकारी सत्संग भवन,सांगोला रोड पंढरपूर येथे दिनांक 27 28 व 29 जून 2023 रोजी आध्यात्मिक निरंकारी सत्संग समारोहाची विशेष पर्वणी करण्यात आलेली आहे.तीन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळामध्ये प्रत्येक तासाला एक सत्संग अशी सत्संगाची मालिका आयोजित करण्यात आली आहे.त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणुन तिन्ही दिवस मोफत दवाखान्याची सोय करण्यात आली आहे.यामध्ये कोल्हापूर व मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर असणार आहे.तसेच सत्संग समारोहाच्या मालिकेद्वारे भक्ती भक्त आणि भगवंत या विषयावर प्रकाश टाकला जाणार असून संत निरंकारी मिशन चा सत्य, प्रेम, शांती , समता, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या ठिकाणी केले जात आहे.मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश काय ? हे जीवन कसे सुखी होऊ शकते ? देवाची प्राप्ती आणि भक्ती का करावी ? आणि कशी करावी,देवाची ओळख कशी होऊ शकते,खरी भक्ती केव्हा सुरू होते आणि त्या भक्तीचा लाभ कोणता ?अशा विविध विषयांवर व प्रश्नांवर या सत्संग च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.यासाठी शास्त्रांचा गाढा अभ्यास असणारे सर्व ज्ञान प्रचारक उपस्थित असणार आहेत.
यानिमित्ताने सुश्राव्य भक्तीगीते,सदविचार आणि ज्ञानी संतांच्या अमृतमय प्रवचनाची मेजवानी वारीत येणाऱ्या भाविकांना प्राप्त होणार आहे.हे सर्व कार्यक्रम कोणत्याही भेदभावाविना सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमानंतर ब्रह्मज्ञान म्हणजेच देवाची ओळख करून देण्याची व्यवस्था संत निरंकारी मंडळा कडून करण्यात आली आहे.तरी सर्व वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी आधी देवाची ओळख करून घ्या आणि मगच भक्ती करा असा उपदेश केलेला आहे .तरी सर्व वारकऱ्यांनी याचा तीन दिवस लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर शाखेचे मुखी गीता ताई घोडके यांनी केले आहे.