Breaking News
recent

पिस्तुलाच्या धाकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार

   



पुणे: विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून संगणक अभियंता तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल चंद्रकांत यादव (वय ३२, रा. साेना अपार्टमेंट, ओैंध रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. यादवविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. ती अविवाहित आहे.

तरुणीने विवाहाविषयक माहिती एका संकेतस्थळावर दिली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी यादव याची विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. यादव हा तरुणीला बालेवाडी‌ भागात भेटला. त्याने तरुणीकडे विवाहाबाबत विचारणा केली. त्यानंतर २४ जून रोजी यादव तरुणीला भेटला. तिला विवाहाचे आमिष दाखविले. बाणेरमधील एका हाॅटेलमध्ये तरुणीला यादव घेऊन गेला. हाॅटेलमधील खोलीत त्याने तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याने तरुणीवर बलात्कार केला. यादवने तरुणीची माफी मागितली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे त्याने सांगितले.

महिनाभरानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउ‌डवीची उत्तरे दिली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी यादवने तरुणीला दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे तपास करत आहेत.

Powered by Blogger.