ढगफुटीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व बेघर गरजूंना आर्थिक मदत द्या. अन्यथा आंदोलन
मागील महिन्यात २२ जुलै रोजी जळगाव जा. , संग्रामपूर तालुक्यात प्रचंड अशी ढगफुटी झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची घरदारे वाघुन गेली नदीकाठच्या घरांमध्ये पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नाही कुटुंबचे-कुटुंब बेघर झाले. काही लोकांची दुकाने, गुरेढोरे वाहून गेल्याने खुप आर्थिक नुकसान झाले.शेतीचे अतोनात नुकसान झाले असून नदीकाठच्या जमिनी शेती पिकांसह खरडून गेल्या तरीही सरकारने कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही.
शेतकऱ्यांनी, गरिबांनी जगावं की मरावं या हाच प्रश्न निर्माण झालेला आहे.जर २० दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा आर्थिक मदत मिळत नसेल तर आम्ही लोकांनी पाहायचं कोणाकडे ढगफुटीमुळे गोरगरीब ,कष्टकरी,मजूर वर्ग यांना होत असलेल्या अडीअडचणी ह्या फक्त आम्हा गरीबांनाच कळणार त्यामुळे शासनाने तात्काळ गरीब लोकांना मदत देणे अपेक्षित आहे.ही मागणी घेऊन आज युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तालुक्यातील भूमिपुत्रांना घेऊन उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी केली.जर आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना, बेघरांना आर्थिक मदत मिळाली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अक्षय पाटील व भूमिपुत्रांनी दिला.यावेळी अशपाक देशमुख ,अजय गिरी, आकाश आटोळे, पप्पू पोटे, गजानन व्यवहारे, रिझवान काझी, परशुराम पाटील, गजानन मानकर, नंदु वाघ, निवूत्ती घुळे, जहीर शेख, संतोष गणगे,माहीन काझी, शेख आरीफ, स्वप्निल बोरसे, अंकुश वाघमारे ,अजिंक्य पाटील तसेच बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते