मलकापूर येथील २६ वर्षीय विवाहितेचा शेजारच्याकडूनच शेगाव येथील लॉजवर अतिप्रसंग आरोपीवर गुन्हा दाखल
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नराधमाकडून वारंवार कुकृत्य
शेगाव प्रातिनिधि
एकमेकांचे शेजारी राहणाऱ्या मलकापूर मधील २५ वर्षांच्या विवाहीत महिलेस आमिष दाखवून एका युवकाने तिला शेगाव येथील अतिथी गेस्ट हाऊसमध्ये वारंवार आणून सतत बलात्कार केला. त्यानंतर मात्र तिचेशी लग्न करण्यास नकार दिला.याप्रकरणी पीडित विवाहीत महिलेचे तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हनुमान नगर मलकापुर येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली की, आरोपी सचिन गजानन हागे हे शेजारी राहत असून त्यांनी माझ्या सोबत ओळख करून मैत्री केली व सन २०२२ ते २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत शेगाव येथे दर्शन कामी आणून 'अतिथी गेस्ट हाउस शेगाव येथे लग्नाचे आमिष तसेच तिच्या मुलाला सांभाळण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेचे शोषण केले. तसेच तिच्या सोबत फोटो काढून सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. व नंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच कोणाला काही सांगीतले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अशी फिर्याद सदर महिलेने पो.स्टे. शेगाव शहर येथे दिली वरून पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी यातील आरोपीविरुध्द कलम ३७६ (१) ३७६ (२) (N) ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय किशोर बर्वे करत आहेत