उपवधू - वर व पालक परिचय मेळावे होणे ही काळाची गरज - आ. डॉ.संजय कुटे
जळगाव जामोद (तालुका प्रतिनिधी )
आजच्या परिस्थितीत मुला - मुलींचे लग्न जुळवणे हे फारच जिकीरीचे कार्य झाले आहे. पैसा, वेळ व योग्य स्थळाची निवड करण्यासाठी उप वधू- वर परिचय मिळावे होणे ही आज काळाची गरज आहे . माझ्या मतदारसंघात जवळजवळ सर्वच जातीचे मेळावे होतात. मी बहुतेक सर्वच ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा आनंद व्दिगुणित करीत असतो. योग्य उपवर - वधूची निवड अशा मेळाव्यात उत्तम होते, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उद्घाटक पदावरून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत उपवधू - वर परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी काढले.
दिनांक 11 फेब्रुवारीला नगरपरिषद सांस्कृतिक भवन जळगाव जामोद येथे झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे तर अध्यक्ष स्थानी महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा अॕड. रोहिणी खेवलकर होत्या. तर वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, भाजपा महिला आघाडी अमरावती च्या जिल्हाध्यक्षा सौ. अनिताताई खेवलकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय युवक आघाडी अध्यक्ष प्रवीण बावनकुळे ,अकोला बार असोसिएशनची उपाध्यक्ष ऍडव्होकेट देवाशिष काकड, अमरावती महिला आघाडी जिल्हा सरचिटणिस सौ. प्रणिता शिरभाते इत्यादी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व श्री संताजी महाराजांच्या पूजनाने झाली. त्यानंतर सोयरीक पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर विचार मंचावरून मान्यवरांनी उपवर वधू-वर यांना भविष्याची दिशा दाखवत आपले परखड विचार मांडले.
[चौकट ]
[आई-वडिलांचे संस्कार जपावे -अॕड. रोहिणी खेवलकर प्रदेशाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र
आपल्या मुला मुलींना वाढवताना आई-वडिलांनी आपले सुख बाजूला ठेवत त्यांना मोठे करतात, शिक्षण देतात, संस्कार करतात . त्यांच्या सुखासाठी अहोरात्र झटतात. आपल्या आपत्यांचे भविष्य सुखात जावो, आनंदात जावो , म्हणून प्रयत्न करतात. त्यांच्या कष्टाची जाण ठेवत मुला-मुलींनी आई-वडिलांचे संस्कार जपावे असे भावोद्गार अध्यक्ष पदावरून अॕड. रोहिणी खेवलकर यांनी काढले.]
या मोफत उपवर वधू वर पालक परिचय मेळाव्यात 198 उपवर तर 84 उपवधूंनी आपल्या नावाची नोंदणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक समितीचे सचिव अनिल भगत तर संचालन सौ प्रगती भगत यांनी व आभार समितीचे प्रसिध्दी प्रमुख अनिल धनभर (वरवट बकाल ) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश आकोटकार, गणेश अरूडकार, संजय चोपडे, अनिल भगत, नंदूभाऊ काथोटे, दुर्गादास आकोटकार, शरद गोमासे, दशरथ कावरे, अशोक थोटांगे, सुनील पाटील, गजानन मनसुटे , विमलताई चोपडे, वेणूताई खवणे, प्रदीप भागवत, मनोज डवले, प्रफुल कावरे , गणेश गोतमारे, अनिल धनभर, चंद्रकांत मंडवाले, गणेश जामोदे , दिलीप आकोटकार , दशरथ अंबरते, अनिल अकोटकार, श्याम पांडव , अंबादास आकोटकार, विजय खरपकार, नितीन नवथळे तथा जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.