Breaking News
recent

केरूर सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध

 



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

बिलोली तालुक्यातील केरूर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या प्रयत्नातून त्यांचे खंदे समर्थक बिलोली बाजार समितीचे संचालक भास्कर तरटे व उद्योजक मारोती आष्टे यांच्या पुढाकारातून बिनविरोध काढून चेअरमनपदी बालाजी सुगावे तर व्हॉइस चेअरमन पदी श्रीरामे मारोती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी बालाजी सुगावे बालाजी, श्रीरामे मारोती, अमोघे विलास, हजारे दिगांबर, तरटे भिमराव, मुजळगे हणमंत, अमोघे सुभाष, राठोड हरी, जाधव भिकाजी, सूगावेरामा, शेख हमीद हुसेन व महीला सदस्य इबितदार लक्ष्मीबाई, तमन्ना पदमिनबाई वरील १३ संचालक बिनविरोध कढण्यात आले. या बिनविरोध संचालकापैकी चेअरमन पदासाठी बालाजी सुगावे तर व्हॉइस चेअरमन पदासाठी श्रीरामे मारोती या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.डी. कोलमवाड व सचिव नागनाथ मठवाले यांनी चेअरमन

बालाजी सुगावे तर व्हॉइस चेअरमन श्रीरामे मारोती यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ह्या निवडीचे भास्कर तरटे, मारोती आष्टे, माजी चेअरमन निळकंठ पाटील, पोलीस पाटील प्रविण वानोळे, माजी सरपंच बालाजी कुरनापल्ले, शेख महंमद जाधव संतोष, शेख महेबुब, अशोक पाटील, भगवान जाधव, राम ताकबिडे दत्ता शिंदे, शेख हमीद अलीसाब, शेख गणी यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Powered by Blogger.