Breaking News
recent

नोटरी असो.च्या जिल्हा सह कार्याध्यक्षपदी नोटरी ॲड. सुभाष निकम .



 प्रतिनिधी मारोती गाडगे 


 गेवराई( बीड)दि. १९ जुलै शनिवार महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या बीड जिल्हा सह कार्याध्यक्षपदी दिनांक १६ जुलै रोजी गेवराई येथील प्रसिद्ध विधिज्ञ नोटरी ॲड. सुभाष निकम यांची निवड महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष ॲड सय्यद सिकंदर अली ,उपाध्यक्ष ॲड महावीर एम कांकरिया व मराठवाडा उपाध्यक्ष नोटरी ॲड राहुलकुमार राका, बीड जिल्हाध्यक्ष नोटरी ॲड एम एस बाहेगव्हाणकर , बीड जिल्हा कार्याध्यक्ष नोटरी ॲड . रामजी दहिवाळ यांच्या पत्राद्वारे करण्यात आली.                 विविध स्तरातून नोटरी ॲड .सुभाष निकम यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावेळी नवनिर्वाचित नोटरी ॲड सुभाष निकम यांनी महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत . या निवडी बद्दल पतंजली योग समिती व महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे वतीने ॲड . सुभाष निकम यांचा सत्कार करण्यात आला .


Powered by Blogger.