सोशल मीडियामुळे हरवलेली दुचाकी अवघ्या पाच तासात मिळाली !
नांदुरा : तालुका ग्राम वडनेर भोलजी येथील प्रतिष्ठित नागरिक अरविंद लाड यांची दुचाकी गाडी क्रमांक mh. 28: 5475 घरासमोरुन अज्ञात चोरट्याने सकाळी 11 वाजता दिनांक 25 एप्रिल रोजी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे नजर चुकवत चोरून नेली असता सदर गाडी मालक अरविंद लाड यांनी आपली हरवलेली दुचाकी ची माहिती सरपंच संतोष भाऊ डीघे यांना कळविले असता त्यांनी गाडीची फोटो सहित पोस्ट सोशल मीडियावर संपूर्ण नांदुरा तालुक्यातील मित्र मंडळी व इतर ग्रुप वर शेअर केली .
त्यामुळे सदरील गाडी त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता चांदुर बिस्वा येथील शेत रस्त्यावर उभी असलेली वडनेर भोलजी येथील पांडुरंग दिवनाले या युवकाला आढळून आले असता .त्यांनी तात्काळ दुचाकी मालक यांच्याशी संपर्क केला. गाडी मालक अरविंद लाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदरील गाडीची ओळख करून आपली दुचाकी गाडी ताब्यात घेतली. सोशल मीडियाचा योग्यवेळी आपण वापर केल्यामुळेच हरवलेली दुचाकी मिळाल्याचा आनंद अरविंद लाड यांनी व्यक्त केला.