दरोडे, जबरी चोरी, रस्ता लुटमार करणारी आंतरजिल्हा अट्टल सराईत गुन्हेटोळी बुलडाणा पोलीसांच्या ताब्यात
![]() |
रोहीणखेड येथिल सोने चांदीचे व्यापाऱ्याचे डोळ्यात दिवसा ढवळ्या मिर्ची पुळ टाकुन लुटणारी ७ जणांची टोळी स्था.गु.शाखा बुलढाणाच्या जाळ्यात |
मोताळा (बुलडाणा) प्रतिनिधी सागर एम.वानखेडे
मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथिल सोन्या चांदीचे ज्वेलर्स विजय नारायण सुरपाटणे हे को-हाळा बाजार येथिल अलंकार ज्वेलरी दुकान बंद करुन नेहमी प्रमाणे दी.२८मार्च रोजी संध्याकाळी ५वा. दरम्यान रोहीणखेडकडे निघाले असता या घटनेतील आरोपी पुर्व पाळत ठेवुन लालमाती ते रोहीणखेड रस्त्यावर एकटा असल्याची संधी मिळताच डोळ्यात मिर्ची पुळ टाकुन व मारहाण करीत विजय सुरपाटणे जवळील ३लाख ७६ हजाराचे सोन्या चांदीचे दागीन्यासह रोख रक्कम हीसकावली या घटनेची फिर्याद धा.बढे पो.स्टे ला दीली असता धा.बढे पोलीसांनी अज्ञात विरुध्द अप क्रं ८१/ २०२२ कलम ३०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला असता जि.पो.अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्था.गु.बुलढाणा शाखेचे पो.नि.बळीराम गिते यांना सदर गुन्हा उघडकिस आणण्याचे सुचीत केले
या गुन्ह्यातील घटनेचे गांभिर्य पाहता गिते यांनी कानुन के हात लंबे होते है या नुसार तपासचक्राला गती देत स्था.गु शाखेच्या पथकासह धा.बढे येथिल पथकाने गुन्ह्यातील तपासात प्रथम सि.सि.टी.व्ही फुटेजची पाहणी करुन व गुप्त माहीतीच्या आधारे धाड पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या जनुना येथिल राजेंद्र सुपडा चंडोल व जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथिल कृष्णा नारायण मुरडकर या दोघांना ताब्यात घेतले विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत या घटनेत एकुण ७ जणांचा समावेश असल्याचे सांगितले गुन्हा करण्या पुर्वी हा सोन्या चांदीचा व्यापारी असल्या वरुन त्याचे जाण्यायेण्याची संपुर्ण माहीती मिळवुन गुन्ह्याचे दीवशी पाळत ठेवुन एकटा असल्याची संधी साधुन त्याचे डोळ्यात मिर्ची पुळ टाकुन त्याला लुटल्याचे कबुली दीली या गुन्ह्यात सहभागी (१) कृष्णा नारायण मुरडकर रा. वालसावंगी ता.भोकरदन जि.जालना (२) ताराचंद तुळशीराम कचरे रा. नांदलगाव जि.औरंगाबाद (३) सुरेश गजानन झाल्टे रा.बोरखेड ता.जि.बुलढाणा (४) विशाल संतोष वाघ रा.को-हाळा बाजार ता.मोताळा जि.बुलढाणा (५) मुकेश ओंकार बस्सी र.तरोडा ता.मोताळा (६) स्वनिल विष्णु गवळी रा.वालसावंगी जि.जालना (७) राजेंद्र सुपडा चंडोल रा.जनुना ता.जि.बुलढाणा सदर गुन्ह्यातील आरोपींना दी.२७ एप्रील पर्यंत वि.न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास धा.बढेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे करीत आहे सदर घटनेतील आरोपी कडुन दी.२५एप्रील पावेतो एकुण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
असुन सदर गुन्ह्यातील आरोपी पैकी ३ आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांचे वर संपुर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल असुन (१) ताराचंद तीळशीराम कचरे वय ३२ रा.नांदलगाव ता.पैठण जि.औरंगाबाद याचेवर खुन १दरोडा ४ गुन्हे जबरी चोरी १७ गुन्हे चोरी ४ असे एकुण २६ गुन्हे तर (२) राजेंद्र सुपडा चंडोल रा.जनुना याचेवर दाखल गुन्हे २ घरफोडी गुन्हे चोरी ३ असे एकुण ५ गुन्हे दाखल असुन (३) कृष्णा नारायण मुरडकर रा.वालसावंगी ता.भोकरदन जि.जालना याचेवर जबरी चोरी १ गुन्हा चोरी २ गुन्हे व ईतर शरीराविरुध्द व मालमत्ते प्रकरणी २ गुन्हे दाखल असुन सदर कारवाई प्रकरणी प्रमुख मार्गदर्शन मा.जिल्हा पो.अधिक्षक अरविंद चावरीया , अप्पर पो.अधीक्षक श्रि.बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधीकारी सचीन कदम यांचे मार्गदर्शनाखाली बुलढाणा स्था.गु शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांचे आदेशाने सपोनि अमित वानखडे,सपोनि मनिष गावंडे,सपोनि धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे , पोउपनि निलेश शेळके ,पोउपनि श्रिकांत जिद्दमवार, पोउपनि आशिष गंद्रे ए.एस.आय मधुकर महाजन ,पो.हे.काॕ. दीपक लेकुरवाळे, नापोकाॕ गणेश पाटील, विजय वारुळे ,जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव , पोकाॕ.गजानन गोरले , गणेश शेळके, वैभव मगर , पोहेकाॕ.सुरेश सोनवणे ,शरद बाठे, सुरज रोकडे, धिरज चंदन, राजु आडवे, दामोधर लठाड, महीला पोकाॕ.सरिता वाकोडे, वाहन चालक शिवानंद मुंढे, संजय जाधव यांनी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले