पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावाणी
![]() |
बुलडाणा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत सन 2021-22 या वर्षात मंजूर निधीतून पारधी समाजाच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमध्ये पारधी / फासेपारधी समाजाच्या जमातीकडून योजनांसाठी अर्ज 4 मे ते 13 मे 2022 दरम्यान सुटीचे दिवस वगळून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला कार्यालयातून छापील अर्ज विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच अर्ज सदर कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येणार असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारिख 13 मे 2022 रोजी कार्यालयीन वेळ असणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
योजनांमध्ये पारधी समाजाच्या 50 शेतकरी लाभार्थ्यांना शेतीकरीता 100 टक्के अनुदानावर काटेरी तार कुंपन खरेदी करण्यासाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच पारधी समाजातील शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 50 महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर डीबीटीद्वारे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पारधी समाजाच्या 100 युवक/ युवतींना 30 दिवस कालावधीचे अनिवासी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सोबत परवानाही देण्यात येणार आहे, तरी इच्छूक पारधी समाजातील लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी केले आहे.