सोनाळा येथे भाजपा महिला मोर्चा चे वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे महिला मोर्चा सोनाळा चे वतीने महादेव मंदिर मठ सोनाळा येथे ३० जानेवारी रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी विश्व मांगल्य सभेच्या विदर्भाच्या अध्यक्षा सौ.अपर्णाताई संजयजी कुटे,भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ.चंदाताई पुंडे विधानसभा प्रमुख महिला मोर्चा सौ.योगिताताई टापरे आदी मान्यवर उपस्थित होत्या.यावेळी मार्गदर्शन करतांना सौ.कुटे म्हणाल्या की आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात महिलांना एकत्रित आणणारा उत्सव म्हणजे "हळदी कुंकू' मकर संक्रांतीचे दिवसापासून रत सप्तमी पर्यंत हा कार्यक्रम साजरा केला जातो.महिलांचा एकमेकांशी स्नेहबंध घट्ट व्हावा प्रेम जिव्हाळा आपुलकी हे ऋणानुबंध जोपासले जावेत संस्कृतीची जपवणूक व्हावी स्त्रियांनी एकत्रित यावे या सामाजिक उद्देशातून हा कार्यक्रम केला गेला त्या बद्दल सोनाळा आयोजक मंडळींचे त्यांनी अभिनंदन केले व पुढच्या कार्याला शुभकामना दिल्या यावेळी संपूर्ण गावातून ७४१ महिलांची उपस्थित या कार्यक्रमाला होती.