धरणगाव ग्रा पंचायत च्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
धरणगाव :दि 31/05/2022 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव ग्रा पंचायत च्या वतीने अभिवादन करण्यात आले .या वेळ सर्व प्रथम धरणगाव च्या सरपंच सौ.संगीताबाई प्रमोद पाटील व उपसरपंच आयु-अमित तुकाराम झनके व ग्रा विकास अधिकारी झालटे साहेब यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर आयु गजानन झनके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे मोलाचे कार्य सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे.
त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. कुशल राज्यकर्ती, रणधुरंधर, मुत्सद्दी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन " यावेळी उपस्थित ग्रा.सदस्य व पत्रकार आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थिती होती.