Breaking News
recent

जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथील प्रा.डॉ. एस एस शुक्ला यांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाकडून मान्यता

 



प्रतिनिधी

 जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख आणि प्राध्यापक पदावर काम करणारे प्रा.डॉ. सुरजप्रसाद शुक्ला यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एका अध्यादेशाद्वारे इंग्रजी विषयात पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. मलकापूर आणि  आसपासच्या भागातील इंग्रजी विषयात पदव्युत्तर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथेच इंग्रजी संशोधन केंद्रावर इंग्रजी विषयात पीएचडी  करण्याची संधी प्राप्त झाली आहे. नुकतीच विद्यापीठाने जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथे इंग्रजी संशोधन केंद्र मंजूर केले आहे, त्याचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या संशोधन केंद्रात डॉ. शुक्ला आणि डॉ.भोगे  हे मार्गदर्शक आहेत गेल्या दोन दशकांपासून प्रा. शुक्ला हे जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथे इंग्रजी आणि इंग्रजी साहित्य हे विषय शिकवत आहेत.

   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे इंग्रजी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितले आहे. तसेच दिल्ली येथील "साहित्य आणि पर्यावरण" विषयावर संशोधन करणाऱ्या एका संस्थेचे सदस्य असून याच संस्थेचे विदर्भाचे समन्वयक आहेत प्रा.शुक्ला यांचे अनेक विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी इंग्रजी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूरचे अध्यक्ष श्री नानासाहेब पाटील तसेच सचिव डॉ. अरविंदजी कोलते व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच प्राचार्य डॉ. पी.एन. लढे,सहकारी प्राध्यापक व मित्रमंडळी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Powered by Blogger.