शिक्षक सेना व जुनी पेन्शन लढा हक्क सेनेने जोपासली सामाजिक बांधिलकी
बुलढाणा प्रतिनिधी
दिनांक 15 मे 2012 रोजी संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या बुलढाणा वासीयांसाठी रूढी परंपरेप्रमाणे शिक्षक सेना परिवार बुलढाणा यांनी मोफत पाणी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आणि पूर्णपणे यशस्वी केला बुलढाणा शहरात भीम जयंती शिवजयंती उत्सवामध्ये शिक्षक सेना परिवार बुलढाणा हे सदैव हिरीरीने सहभाग नोंदवतात मागील मिरवणुकी दरम्यान पाणीवाटपाचा सह कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी पॅकिंग फूड पॅकेज उपलब्ध करून त्यांनी अनोख्या पद्धतीने आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे.
सदर उपक्रमाचे माननीय आमदार संजू भाऊ गायकवाड तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांनी कौतुक करून शिक्षक सेना ही केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर नसून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात पूर्ण ताकतीने आपला सहभाग नोंदविल्या मुळे शिक्षक सेनेचे वैशिष्ट्य इतरांपेक्षा वेगळे आहे असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले सदर उपक्रम राबवत असताना शिक्षकसेना पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रमोद पवार,जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचे विदर्भ अध्यक्ष मंगेश भोरसे,शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील जाधव जिल्हाध्यक्ष रवी वाघ,जिल्हा कोषाध्यक्ष गजानन गाढे,उपाध्यक्ष निलेश कन्नर,राज फासे,सहसचिव नितीन अपार,कार्यकारिणी सदस्य सुधीर किंहोळकर,लढा हक्क सेनेचे समन्वयक प्रशांत जुमडे, संदीप पाध्ये,विलास खेडेकर आदी शिक्षक सेनेचे व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते