मा.केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा माजी खासदर आनंदराव अडसुळ यांनी दिली बुलडाणा कृउबा समितीला सदिच्छा भेट
सागर वानखेडे बुलडाणा प्रतिनिधी-
शिवसेना नेते तथा अमरावती/बुलडाणा जिल्ह्याचे माजी खासदार तथा मा केंदीय अर्थराज्यमंत्री मा श्री आनंदराव अडसुळ यांनी दि ३१/५/२२ रोजी बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. बाजार समितीत विकास कामांच्या माध्यमातून झालेला बदल पाहुन समाधान व्यक्त केले. यावेळी बाजार समितीच्या सचिव कु वनिता साबळे व सहकाऱ्यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बुलडाणा बाजारसमिती ही चिखली बाजारसमितीतून विलग झाल्यापासून सन २०१५/१६ मध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मा जालिंधर बुधवत यांनी सभापती म्हणून कार्यभार सांभाळला. मा जालिंधर बुधवत यांच्या सभापती पदाच्या कार्य काळापासून ते आजपर्यंत बाजारसमितीत झालेला बदल हा व्याख्यानाजोगा असल्याचे मा खा आनंदराव अडसूळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भालचंद्र देशमुख साहेब, शिक्षकसेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रमोद पवार सर, सचिव कु वनिता साबळे, जितेंद्र गवई, शशांक जेउघाले, गजानन व्यवहारे, सचिन तायडे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.