वडनेर भोलजी येथे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
ता : नांदुरा, ग्राम . वडनेर भोलजी येथे दिनांक ३१ मे रोजी खंडोबा संस्थान मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी खंडोबा मंदिर निर्माणासाठी मोलाचं सहकार्य केलेले स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ता निनाजी धोंडु कुयटे यांना उपस्थित समाज बांधवांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सु .ब. मोहता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नवलकर सर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले व स्वतः कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित समाज बांधवांना कुशल प्रशासक अहिल्या बाई होळकर यांच्या जीवन चरित्र विषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केले
शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निंबाजी वरखडे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रा .म .सदस्य ,सुनील भाऊ कुयटे, सागर दिवनाले , योगेश करंकार ,गणेश साबे ,प्रल्हाद पाचपोळ, यांनी मोलाचे सहकार्य केले तर राजू वसतकार, गोविंदा बाजोडे, गजानन पाचपोळ, अनिल साबे , किसना परमाळे इत्यादीची या अभिवादन सभेला उपस्थिती होती
