Breaking News
recent

डॉ. पंढरी इंगळे यांची आचार्य (पि एच डि आयु.) पदवीसाठी निवड



चिखली - मनोज जाधव 

   तालुक्यातील आमोना या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ.पंढरी उत्तमराव इंगळे यांची द्रव्यगुण विज्ञान या विषयात आचार्य (पि.एच.डी) पदवीसाठी वर्धा येथे डी.एम.आय.एम.एस.मध्ये निवड झाली. डॉ पंढरी इंगळे यांचे चिखली येथे सुप्रसिद्ध गँगाई हॉस्पिटल असून ते गेल्या आठ दहा वर्षांपासून चिखली येथे वैद्यकीय सेवा देत आहेत,डॉ.पंढरी इंगळे हे मुळचे चिखली तालुक्यातील आमोना या छोट्याशा गावातील कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला आले शेतकरी कुटुंबातील म्हटल्यावर जेमतेम सुरवातीच शिक्षण पहिली ते पाचवी पर्यंतच प्राथमिक शिक्षण मराठी पूर्व माध्यमिक शाळा आमोना येथे झालं.

   मुळातच अभ्यासात कुशाग्र असलेल्या पंढरी इंगळे यांचा सहाव्या वर्गासाठी नवोदयला नंम्बर लागला अर्थातच त्यांचं माध्यमिक शिक्षण हे गजाननाचरणी शेगाव येथे झालं,अकरावी, बारावी त्यांच शिवाजी महाविद्यालय चिखली येथे झालं,त्यांचे पितृतुल्य मावस बंधू समाधान गाडेकर व कैलास गाडेकर हे पत्रकार व वृत्तपत्र वितरक असल्याने महाविद्यालयात शिक्षण सुरू असतांना डॉ.पंढरी इंगळे यांनी गलोगल्ली वृत्तपत्र वितरण देखील केले आहे हे विशेष,त्यानंतर त्यांना मुळातच आयुर्वेदात रस असल्याने त्यांनी पुढील शिक्षण गोंदिया येथून बि.ए.एम.एस. पूर्ण केलं,त्यानंतर त्यांनी चिखली येथे १५ जून २०१२ रोजी आरोग्य सेवा सुरू केली,एक नवखा तरुण तो ही बि ए एम एस डॉ चिखली शहरातील नामांकित हॉस्पिटल परिसरात स्वतः च्या कौशल्याच्या बळावर मोठं मोठ्या डॉ ला देखील लाजवेल अशी आश्चर्य चकीत करणारी आयुर्वेदिक, निसर्गोपचार,ऑलॉपॅथी सेवा त्यांनी सुरू केली कुठला ही रुघ्न असो त्यांनी रुघ्न सेवेत कधीच आर्थिक व्यवहार आड येऊ दिला नाही.

    प्रत्येक सण उत्सव असेल महापुरुषयांच्या जयंत्या असतील त्या निमित्ताने गावो गावी शिबिर घेऊन लोकांना मोफत औषधोपचार त्यांनी केले,वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही ते सदैव अग्रेसर असतात, वैद्यकीय सेवा सुरू असतांनाच त्यांनी नाशिक येथील सप्तश्रृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मधून एम.डी.देखील केलं,त्यानंतर ही ते स्वस्थ न बसता त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले,मानसशास्त्र या विषयात त्यांनी बि.ए. केलं,समाजशास्त्र या विषयात एम. ए ही पूर्ण केलं व शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट देखील मिळवण्यासाठी पात्र झाले विशेष म्हणजे त्यांचे छोटे बंधू देखील जेनेटिक या विषयात पि एच डी ,झालेले आहेत व छोट्या वाहिनी ह्या देखील प्लॅन्ट फिजिओलॉजी मध्ये पि एच डी प्राप्त आहेत.

   त्यांच्या अर्धांगिनी ही फार्मसीच्या शिक्षणानंतर कुटुंबातील तिघांप्रमाणे पुढील शिक्षण घेत आहेत,हा त्यांच्या कारकिर्दीचा लेखा जोखा त्यांच्या स्वागत प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी मांडला, याप्रसंगी डॉ. इंगळे यांनी आयुर्वेदिक औषधी वनस्पती वरिल संशोधन आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पतीचा उपयोग मानवी आरोग्याच्या दृष्टीने कसा करता येईल यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे सांगितले, जिल्ह्याभरातून त्यांच्या स्नेहीजनांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Powered by Blogger.