दारू व फॉर्च्युनर कार २० लाख ५ हजार ६३०रुपयांचा मुद्देमाल जप्त
![]() |
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई |
नांदुरा/प्रतिनिधी श्रीकांत हिवाळे
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील अब्दुल हकीम देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत होते.मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचे मनसुबे उधळून लावत त्याला रंगेहात मुद्देमालासह अटक केली. काल रात्री उशिरा नांदुरा शहराच्या स्टेट बँक चौकात ही कारवाई करण्यात आली.एक आठवड्याच्या आधी महागड्या फॉर्च्युनर कार मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यामुळे नांदुरा येथील स्टेट बॅंक चौकात पथकाने सापळा रचून फॉर्च्यूनर कार थांबवली.
कारची झाडाझडती घेतल्यावर त्यात वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू आढळून आली.पोलिसांनी दारू व गाडी असा एकूण २० लाख ५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदुरा पोलिस स्टेशन अंतर्गत अब्दुल आकिब,अब्दुल सादिक (१९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलढाणा,) अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव)यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश किनगे केदार फाळके यांनी केली.