रोहिणखेड येथे पवित्र रमजान ईद उत्सवात साजरी, हिंदू-मुस्लिम एकतेचे घडले दर्शन
मोताळा प्रतिनिधी
मोताळा तालुक्यातील ऐतिहासिक गाव असणाऱ्या रोहिणखेड गावात पवित्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या, तर मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीया सणाच्या शुभेच्छा दिल्या व हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. संपूर्ण भारत देशासाठी अमन, प्रेम,शांती कायम राहावी अशी देखील सामूहिक प्रार्थना पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रोहिणखेड येथील मुस्लिम बांधवांनी केली. विशेष म्हणजे याच दिवशी हिंदू बांधवांचा अक्षय तृतीया सण होता, पवित्र रमजान ईद ची नमाज झाल्यावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट व गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
तर मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देऊन पुन्हा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. यावेळी रोहिणखेड येथे रमजान ईद च्या दुसऱ्या दिवशी कुरेशी परिवार व समस्त समाज बांधव रोहिणखेड यांच्याकडून खीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी मध्ये जिल्हा काँग्रेस समन्वयक गणेशसिंग राजपूत, रोहिणखेड गावचे सरपंच डॉ.भानुदास हुंबड, माजी सरपंच रमेशसेठ येंडोले, शैलेश भावसार, प्रसाद हुंबड,डॉ. नंदकिशोर किन्होळकर, बाळू भाऊ सोनवणे, श्रीकांत कुल्ली, गणेश राजस, अनिकेत हिंगे, शकील कुरेशी, साजिद कुरेशी, राजा बाबू , अनिस कुरेशी, नवेद कुरेशी, मो.नईम, खाजा सेठ, अकील सर,मुज्जू मिस्तरी,उस्मान मियाजान सेठ, मोनीस कुरेशी, ताहिर कुरेशी, बाळू भाऊ देशमुख, समस्त हिंदू मुस्लिम बांधव यांची उपस्थिती होती.