Breaking News
recent

अग्नीशामक दल व सामाजिक कार्यकर्ते सचिन वैद्य यांनी धाव घेत विझविली आग..!

 


देवळी प्रतिनिधी

  स्थानिक देवळी शहरातील चंद्रकौशल्य तडस सभागृह समोरील काकडे यांच्या खुल्या असलेल्या जागेत आज दि.24/05/2022 रोजी सकाळी 11 वाजता  अज्ञात इसमाने आग लावली होती त्या मोकळ्या जागेत केर, कचरा,  सुकलेली झाडेझुडपे इतरत्र पसरलेली आहेत ती आग वाढत सर्व आजूबाजूचा परिसर आगीने वेढला  असता .

  परंतु  सामाजिक कार्यकर्ते सचिन वैद्य यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करीत नगर परिषद कर्मचारी सुनील खोंड यांना आगीची दूरध्वनीद्वारे माहिती कळविली  असता त्यांनी शनाचा विलंब न करता घटनास्थळी अग्निशामक दल पाठविले अग्नीशामक दलांनी वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणत पुढील अनर्थ टाळला व सुदैवाने त्यामध्ये कुठलेही नुकसान झाले नाहीत यामध्ये अग्निशामक  वाहन चालक अक्षय क्षीरसागर , रणजित दाबेकर फायरमन, शेख अकील फारूकी  ,  श्रावण पारिसे , अथर्व नरड , सचिन वैद्य व इतर नागरिकांनी सहकार्य केले

Powered by Blogger.