24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
आज दि. 24/05/22 रोजी मलकापूर शहरातील माता महाकाली नगर परीसरातील रवी मुरे या विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
आत्महत्या करणारा युवक आपले आई वडील लहान भाऊ व पत्नीसह माता महाकाली नगरातील घरामध्ये राहत होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन पुढील तपास मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.