तरुणाची दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वहत्या
मलकापूर
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तरुणाची दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वहत्या केल्याची घटना आज दी.7 मे रोजी सकाळी उघड झाली आहे. सविस्तर असे की झोडगा अनुराबाद येथील आकाश अरुण मोरे वय 24 याने आज सकाळी 7-30 च्या सुमारास धरणगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6जवळील शेतातील निनु पुजाजी पाटील यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आई-वडील हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात तो एकुलता एक होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही रत मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे प्राथमिक तपास नरेंद्रसिंह ठाकूर पोलीस उपनिरीक्षक हे करीत असून पुढील तपास रोकडे हे करीत आहेत. झोडगा येथे हळहळ व्यक्त होत आहे.