संतनगरीत महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाची प्रथम आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
शेगाव प्रतिनिधी
आज दि.२३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाची प्रथम राज्य आढावा बैठक हॉटेल अन्नपूर्णा शेगाव येथे म.रा.गा.का.पोलीस पाटील संघाचे सन्माननीय राज्य अध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे, कार्याध्यक्ष भ्रंगराज परशुरामकर, राज्य सचिव कमलाकर मांगले, राज्य संघटक, बळवंतराव काळे पाटील, स्वराज्य खजिनदार निळकंठ थोरात, संघटक नवनाथ धुमाळ, राज्यसह सचिव गोरख टेन्भकर पाटील, सहसचिव डी एस कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोर पाटील, मराठवाडा अध्यक्ष जब्बार भाई पठाण, खान्देश आध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सौ.तृप्तीताई मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा सौ.रोहिणीताई हांडे, आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून करण्यात आली, संघाची स्थापना झाल्यापासून राज्य कार्यकारिणीची ही प्रथम बैठक असल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी आपआपल्या जिल्ह्यातिल आपल्या कामाकाजचा आढावा मांडला व सोबतच आपल्या अडी अडचणी व राज्य संघाकडून असलेल्या अपेक्षा या बाबतीत मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक विषय राज्य पदाधिकारी यांच्या समोर मांडण्यात आले. सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी मांडलेल्या विषयानुसार राज्य अध्यक्ष यांनी प्रत्येक राज्य पदाधिकारी यांना विषय वाटून देऊन आलेल्या विषयानुसार सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने बळवंतराव काळे कमलाकर मांगले, श्रीकृष्ण साळुखे, परशुरामकर साहेब यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच राज्य अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात संघाचे रजिस्ट्रेशन , संघाचे पदाधिकारी (फाउंडर मेंबर) आर्थिक व संघाची ध्येय धोरणे तसेच ऑडिट बाबत स्पष्टपणे माहिती माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक समस्याचे निरसन झाले . तसेच वर्षातून दोन राज्य कार्यकारिणीच्या सभा आयोजित करण्यात येतील, अशी माहिती राज्य अध्यक्षानी दिली. सभा दिवसभर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात होऊन सर्व समस्यांचे निरसन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व जिल्हा पदाधिकारी, यांना बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शिलाताई देवानंद पाटील, यांच्या तर्फे गजानन महाराजांची एक एक प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. सदर कार्यक्रमास राज्यभरातील पोलीस पाटील संघाचे दोनशे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य मार्गदर्शक गजाननराव भोपळे पाटील यांनी तर सूत्रसंचालन गणेश गायकवाड व आभार प्रदर्शन शिंदे पाटील यांनी केले.