राष्ट्रीय गुणगौरव सोहळयात मान्यवरांचा सन्मान
नांदुरा प्रतिनिधी
अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन महसूल प्रबोधिनी हॉल औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. नंदकिशोर घोडेले (मा. महापौर औरंगाबाद) कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंदा रत्नाकर अहिरे व स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. संघर्ष सावळे(अर्थशास्त्र विभाग-डॉ. बा. आ.म. विद्यापीठ) कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. हबीब भंडारे (कवी संमेलनाध्यक्ष) तसेच मा. रूपाली पवार (सुप्रसिद्ध अभिनेत्री) मा. संगीता खैरनार ( विश्वसुंदरी) मा. प्रिया सुरते (सुप्रसिद्ध अभिनेत्री) मा. सु.मा. शिंदे(महासचिव विदर्भ प्रदेश तथा संपादक सम्राट अशोक मलकापूर) मा. संदीप त्रिभुवन (संचालक शब्द गंध प्रकाशक समूह औरंगाबाद) असे विविध मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.आलेल्या मान्यवरांचे स्वागत समारंभ झाल्यावर याप्रसंगी मा. महापौर नंदकिशोर घोडेले यांनी औरंगाबाद महानगर पालिकेच्या आवारात महाकवी वामनदादा कर्डक स्मारक उभारण्याचे आश्वासन देऊन महाकवी वामनदादा कर्डक यांचा इतिहास सांगितला.स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. संघर्ष साळवे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्द सन्मानाने स्वागत केले व कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धतीने झाले हे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. आनंदा अहिरे यांनी आलेल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. तर महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपले संपूर्ण आयुष्य बुद्ध ,फुले, शाहू, आंबेडकर यांची सेवा करण्यात घालवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दहा हजाराच्या वर ती गाणी लिहुन विश्वविक्रम केलेला आहे. विविध गाण्यांच्या व कवितेच्या ओळी आपल्या भावना व्यक्त करून दाखवले आहे.
राष्ट्रीय गुणगौरव सोहळात महाराष्ट्र व भारतातून आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण या अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या कार्य विरांचा कौतुक सन्मान सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.यावेळी मलकापूर शहर बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शीतल शेगोकार चा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आला तर त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी अजित भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड गाजले. त्यात प्रामुख्याने निमंत्रित कवी हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले होते. अतिशय नियोजन पद्धतीने कार्यक्रम हा पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा गोवर्धने ,प्रा. वनिता बनकर यांनी सूत्रबद्ध पद्धतीने केले तर आभार प्रदर्शन वंदना भिषे यांनी व्यक्त केले