Breaking News
recent

मलकापूर शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहिमेला सुरुवात.



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

       दिनांक 20 मे 2022 शुक्रवार रोजी मलकापूर नगर परिषद द्वारे अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. शहरातील विशेषतः आठवडी बाजार,तहसील चौक स्टेशन, रोड सिनेमा रोड, वल्ली चौक, बुलढाणा रोड यावर गत काही वर्षांपासून अतिक्रमणाचा विळखा वाढत चाललेंला आहे. दिवसेंदिवस दुकानदारांकडून, फळविक्रेते भाजीविक्रेते टपरीधारक यांच्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे विशेष करून निमवाडी चौक ते चार खंबा चौक, आठवडी बाजार येथे अतिक्रमण धारकांनी शासकीय जमिनीवर पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे केलेले आहे हे सर्वज्ञात आहे. या भागातून सर्वसामान्य नागरिकांना साधे चालणे सुद्धा अवघड झालेले आहे. 

   जाणीवपूर्वक करण्यात आलेले अतिक्रमणामुळे शाळकरी मुले मुली माता-भगिनींना या भागातून जाणे-येणे करताना अतोनात त्रास होत आहे, तसेच महीला, मुलींना छेडछाडीचे प्रकार ही होत असल्याचे बोलले जात आहे. त्यातून काही जागरूक नागरिकांकडून यासंबंधी आवाज उठवण्यात आला तर त्यातून वादाचे प्रसंग उद्भवून त्यातून जातीय तेढ निर्माण केल्या जाते. एकंदरीत पाहता विविध संघटना, समाजसेवक,जागरूक नागरिक व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी या बऱ्याच वर्षांपासून होत असल्याने नगरपरिषदेद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

    परंतु लहानसहान अतिक्रमणांऐवजी मोठे व पक्के असलेले आठवडी बाजारातील अतिक्रमणाला नगरपालिका बुलडोजर लावण्याचे धाडस दाखवेल का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेत आज चर्चिल्या जात होता. एकीकडे पोटापाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचे अतिक्रमणामुळे कठीण झालेले जगणे यातून आता काय मार्ग निघणार. पालिका संपुर्ण अतिक्रमण काढणार की राजकीय दबावामुळे थातूरमातूर मोहीम राबवून जैसे थे च राहणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Powered by Blogger.