Breaking News
recent

बेलाड फाट्यानजीक गांज्यासह 7,06, 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त

    


नागेश सुरंगे प्रतिनिधी


    मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे अमली पदार्थ जप्त केल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील बेलाड फाट्यानजीक काल दिनांक 06 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की बहापुरा गावाकडून बेलाड फाट्या वर येणारी सेंट्रो कार क्रमांक एम. एच. 13. ए. सी. 1607 त्यावरील चालक हा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अमली पदार्थ बाळगून त्याची वाहतूक करीत आहे. 

   पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आसिफ शेख, अनिल डागोर, सलीम बर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गावाकडून बेलाड फाट्यावर येणाऱ्या रस्त्यावरील कल्याण ऑफिस परिसरातील पोलवरील लाईटच्या उजेडात लाल रंगाची सेंट्रो कार क्रमांक एम. एच. 13. ए. सी. 1607 येताना दिसली या कारला हात देऊन थांबून त्यातील चालकाचे नावगाव विचारले असता त्याने आपले नाव गोपाल आनंद कुमार जैस्वाल वय 43 राहणार पोस्ट रोड कालीकुरती, जालना असे सांगितले व त्याच्यासागितले ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता कार मध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अमली पदार्थ 42 किलो 240 ग्रॅम, 12 हजार रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकूण पाच लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा तसेच आरोपी गोपाल आनंद कुमार जैस्वाल यांच्या ताब्यातील सेंट्रो कार किंमत अंदाजे दोन लाख रुपये असा एकूण 7,06, 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

   सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली. अपराध नंबर 270/2022 कलम 8 (क ), 20 (व), (क) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 ( एन डी पी एस ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

   सदर कारवाई अरविंद चावरिया  पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, अभिनव त्यागी उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर, पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, पोहेका भगवान मुंडे, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, अनिल डागोर, आसिफ शेख, सलीम बर्डे, प्रमोद राठोड, संतोष निंबाळकर यांनी केले आहे.
Powered by Blogger.