Breaking News
recent

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे 1 ले राज्यव्यापी अधिवेशन व कार्यकर्ता मेळावा उत्साहात साजरा



        स्वराज बहुउद्देशीय सेवा संस्था रायगड द्वारा संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन व कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक ६ जून २०२२ रोजी नवी मुंबई पनवेल येथील खांदा कॉलनी खांदेश्वर स्थित आगरी शिक्षण संस्थेच्या हाॅलमधे  मोठ्या उत्साहात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक श्री.अशोक पवार,श्री.सुभाष बसवेकर संस्थापक अध्यक्ष,श्री.शेखर कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शांताराम पाटील कोकण विभाग प्रतिनिधी,,संजय किणीकर पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी,सोपान पवार मराठवाडा प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. 

        कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन केले.  माहिती अधिकार क्षेत्रात कार्य करून त्याद्वारे सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते अहोरात्र निस्वार्थ भावनेने कार्य करत शासन व प्रशासनावर वचक ठेवतात. शासन व्यवस्थेमधे होणारा भ्रष्टाचार माहिती अधिकारा मार्फत बाहेर काढून जनतेच्या पैशाचा होणारा दुरुपयोग या संघटनेच्या माध्यमातून संघाचे कार्यकर्ते अहोरात्र करत असतात.2011साली स्थापन झालेल्या या संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.सुभाष बसवेकर सर राज्य कार्याध्यक्ष श्री शेखर कोलते सर,प्राध्यापक अशोक पवार सर यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे कार्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्राभर मोठ्या जोमाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक ६ जून रोजी पहिले राज्यव्यापी अधिवेशन व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

        यामध्ये प्राध्यापक अशोक पवार सर अमळनेर यांनी कार्यकर्त्यांना माहिती अधिकार क्षेत्रातील विविध कलमांची माहिती करुन देत मार्गदर्शन केले तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुभाष बसवेकर, राज्य कार्याध्यक्ष श्री शेखर कोलते सर यांनी कार्यकर्त्यांना अनमोल मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले, दाखल होणारे खोटे गुन्हे याविरोधात संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा द्यावा माहिती अधिकाराची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले.यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती दिली.कार्यक्रमांमध्ये माहिती अधिकार क्षेत्रातील कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत कार्य करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले तसेच विविध कार्यकर्त्यांनी आप आपले अनुभव मांडले. 



        तसेच या संघटनेच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोपान पवार यांनी उत्कृष्टरित्या केले. अशा प्रकारे हे पहिले राज्यव्यापी अधिवेशन व कार्यकर्ता मेळावा पार पडला. या अधिवेशनासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष अंबादास पवार (शेगांव) , ता.प्र.प्रमुख धर्मेशसिंह राजपूत मलकापुर यांची उपस्थिती होती.

Powered by Blogger.