Breaking News
recent

गोविंद विष्णू महाजन विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोशात स्वागत

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर दि. २९ जून शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील शाळांचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव म्हणून साजरा व्हावा या उद्देशाने येथिल गोविंद विष्णू महाजन विद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले.

   या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसरात विविध प्रकारची सजावट, रांगोळी, फुगे, हार, तोरणांची सजावट करण्यात आले. तसेच विद्यार्थांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी आकर्षक सेल्फिपाॅईंट सुद्धा तयार करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रवेशोत्सवासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष चैनसुख संचेती, प्रमुख मार्गदर्शक डाॅ. महेंद्र टेकाडे, सचिव अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश महाजन, संचालक शक्तीसिंह राजपूत, दयानंद वानखेडे, प्राचार्य एम.पी.कुयटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

      आपल्या मार्गदर्शनात डाॅ. महेंद्र टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येकाने शालेय जिवनात प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी विद्यार्थांची बौद्धिक प्रगती, सर्वांगीण विकास आणि उज्वल भविष्यासाठी संस्थेतील प्रत्येक घटक आपल्यातील पुर्ण क्षमतेने प्रगती करतील याची ग्वाही देऊन विद्यार्थांचे विद्यालयात स्वागत केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

     या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यांनी, पालक बंधूभगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन एच.एस.राजपूत, प्रास्ताविक एम.आर.येरवाल यांनी तर आभार प्रदर्शन एस.टी.सोनोने यांनी केले, सौ एस.एन.महाजन यांनी पसायदान गाऊन समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊ गिरी, रमेश ईंगळे यांच्यासह सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचार्यांनी योगदान राहिले.

Powered by Blogger.