Breaking News
recent

विमल गुटख्यासह दोन गाड्या व तिघांना एलसीबीने घेतले ताब्यात

  


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर  विमल गुटखा, तंबाखू असलेली गाडी जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून एलसीबी पथकाने विमल गुटख्यासह दोन गाड्या व तीन आरोपींना ताब्यात घेत १५ लाख ६८ हजार २०० रूपयांचा माल जप्त केल्याची कारवाई २७ जून रोजी केली. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दोन गाड्यांमध्ये विमल गुटखा, तंबाखू हा माल जात असल्याची माहिती मिळाली.

   या माहितीवरून एलसीबीचे पथक व पोलिसांनी सापळा रचून मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी क्रमांक एम. एच. ०४ डि डब्ल्यू १५७१ आणि टाटा इंडीगो सीएस गाडी क्रमांक एम.एच.१४ सी एक्स ९६५९ या दोन गाड्यांची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा आढळून आला. सदर विमल गुटख्यासह दोन्ही गाड्या व आरोपी शेख नवाज शेख हुसेन (वय २७) रा. नांदुरा खु., जुनेद बेग मिर्झा बाबा (वय २३) रा. कोळंबा रसुलपूर ता. नांदुरा, मोअज्जम उर्फ मज्जु इस्माईल बेग (वय २५) रा. मुल्लापुरा नांदुरा या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेवर कलम १८८, २७३, ३२८ भादंविसह कलम अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २००६ चे कलम २६ (२) (आयव्ही) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई एपीआय मनीष गावंडे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळे, गणेश पाटील, संजय नागवे, वाहन चालक मधुकर रगड यांनी केली.



Powered by Blogger.