भाजपा सरकारचे आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप
नांदुरा प्रतिनिधी नागेश सुरंगे
भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा मा. सौ उमा ताई खापरे यांच्या आदेशाने आमचे आधारस्तंभ माननीय श्री चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात व भाजप बुलढाणा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सिंदुताई खेडेकर यांच्या सूचनेनुसार भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान म्हणून आठ वर्षाच्या यशस्वी व सबका साथ सबका विकास या ध्येय धोरणानुसार व जाहीरनाम्यातील वचनपूर्ती व गोरगरीब, शेतकरी, मजुरवर्गासाठी कल्याणकारी योजना व अखंड भारत देशाचे .पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपा सरकारचे आठ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल दिनांक 02/06/2022 वार गुरुवारला सकाळी 9.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे फळ वाटप हा कार्यक्रम भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव सौ अनिताताई ब्रम्हानंद चौधरी यांनी आयोजित केला. या कार्यक्रमां मध्ये प्रमुख उपस्थिती सौ लताताई किशोर ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा,सौ सारिका ताई राजेश डागा शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
