Breaking News
recent

दिपक भोसले व प्रशांत पाटील यांची रयत क्रांती पक्षाच्या राज्य प्रवक्ता पदी निवड



मुंबई - मनोज जाधव

दि.२१ व २२ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रयत क्रांती संघटनेची व पक्षाची राज्यव्यापी विस्तारित कार्यकारिणी बैठक मुंबई येथे संपन्न झाली. 

या बैठकीला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीस उपस्थित राहून संबोधित मार्गदर्शन केले व भाजपा नेते नवभारत शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं,

    माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी रयत क्रांती पक्षाच्या अध्यक्षपदी भानुदास शिंदे  तर पक्षाच्या प्रवक्ते पदी  दीपक भोसले व प्रशांत ढोरे पाटील यांची निवड केली,रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाच्या महत्वाच्या निवडी संपन्न झाल्या या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,प्रशांत ढोरे पाटील हे सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेच्या पायाभरणी पासून सोबत असून कित्येक कार्यकर्ते आले व गेले देखील परंतु प्रशांत पाटील यांनी पडत्या काळात देखील सदाभाऊंची साथ सोडली नसल्याने सदाभाऊंनी त्यांची राज्याच्या कोअर कमेटीत तसेच पक्षाच्या प्रवक्तेपदी व अकोला, वाशिम जिल्हा सँम्पर्क प्रमुख पदाची  महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे,यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. दिपक पगार, शिवनाथ जाधव युवा नेते सागर खोत, महिला प्रदेशाध्यक्षा नीताताई खोत, दीपक भोसले, प्रा.सुहास पाटील, पांडुरंग शिंदे, एन.डी. पाटील, लालासो पाटील, जितू आडेलेकर,गजानन राजबिंडे,दिलीप पाटील,नाना पाटील,विठ्ठल गोतमारे पाटील,प्रकाश पाटील,वंदना वाघ,अर्चना शिंगणे,सचिन काकडे,सचिन पडघान,संजय कुटे यांच्या सह राज्य भरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती.

  आमदार गोपीचंद पडळकर साहेब बोलताना म्हणाले सदाभाऊ व मी सामान्य कुटुंबातून तयार झालेले नेतृत्व आहे. हे प्रस्थापितांना बघवत नाही. म्हणूनच खोटेनाटे आरोप करून आम्हास बदनाम करण्याचे शेडयंत्र रचत आहेत या गोष्टीला आम्ही दोघेही भिक घालत नाही. तुम्ही प्रामाणिक लोकांचे काम करीत रहा ,बोलत रहा तुम्ही सुध्दा आमदार ,खासदार होऊ शकता,मला कधीही हाक मारा मी तुमच्या बरोबर आहे.

            सदाभाऊ बोलताना म्हणाले मी मंत्री असताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो मोटर वाहतूकदार, छोटे व्यापारी, पान टपरी, छोटेभाजीपाला फळ विक्रीते, अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलूतेदार या वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. माझी लढाई गावगाडा विरुद्ध वाडा अशीच राहिल. निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आप आपल्या जिल्ह्यात तळा गळात जाऊन लोकांच्या अडचणी समजून घ्या. जोमाने कामाला लागा मी राज्यभर दौरा करणार असून या सर्व लोकांच्या  अडचणी समजून घेणार आहे व त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगले काय आणि वाईट काय मला कळाले आहे मी निष्ठावंत कार्यकर्त्याना ताकद देणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

    पक्षाचे प्रवक्ते प्रशांत ढोरे  पाटील यांनी दोन दिवसीय राज्यव्यापी बैठकीचा समारोप करतांना सदाभाऊंच्या जवळ सत्ता असो की सत्ता नसो या बैठकीला जो कार्यकर्ता उपस्थित आहे तो कार्यकर्ता हौसे,गौसे,नौसे कार्यकर्ते नसून एकनिष्ठ आहेत ते सदाभाऊंची साथ कधीच सोडणार नाही असा विश्वास त्यांनी बोलतांना व्यक्त केला यावेळी रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष किरण उतळे, रयत क्रांती संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष अशोक लोहार, दीपक पाटील, संभाजी पाटील सत्यजित कदम, जितेंद्र सूर्यवंशी, अक्षय सपाटे,संग्रामपूर तालुका अध्यक्ष मानखरे यासह राज्यातून प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

           ‌

Powered by Blogger.