Breaking News
recent

जिल्हा परिषद सदस्य मा. हनवंतराव वट्टी यांच्या परिश्रमाला यश







संवाददाता आमगांव (गोंदिया) 

        आमगाव तालुका अंतर्गत प्रत्येक गावात म. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामे सुरू आहेत. व मनरेगा अंतर्गत मजदुर वर्गाला ज्या योजनेचा माध्यमातून सुविधा मिळतात त्या सुविध्याला उद्देशून ग्रामीण भागातील मजदुर वर्गाला परस्पर भेटीच्या माध्माद्वारे लढा देत असलेले जि. प. सदस्य मा.हनवंतराव वट्टी यांचे मनःपूर्वक अभिनंदन मा. सरपंच सौ. धनवंताबाई हनवंतराव वट्टी, ग्रा. प. सुरकुडा पं. स. सदस्या मा. सुनंदाताई उके, मा. उपसरपंच नुकनलाल जी रहांगडाले ग्रा.पं.सुरकुडा, सौ. योगिता ताई पुंडे पं. स. तिगाव, सर्व ग्राम पंचायत सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. जि. प. सदस्य वट्टी यांनी संबोधन करताना म्हटले की मागेल त्याला काम असे कार्यक्रमात 

बोलत होते. त्यानंतर दि.३१/५/२०२२ ला ग्राम पंचायत सुरकुडा येथे मनरेगा अंतर्गत ३०,००००० रू (तीस लाख रुपये) रोडाचे भूमिपूजन, १५ वित्त आयोग अंतर्गत दलीत वस्ती मध्ये डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्मारक ओटा बांधकामाचे भूमिपूजन, १५वित्त आयोग पं. स. निधी अंतर्गत सौंदर्यिकरण धोबिटोला येथे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूनप्रसंगी वरील सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Powered by Blogger.