Breaking News
recent

श्री सूर्यमुखी मोठा हनुमान समोरील आतिक्रमन हटावा करीता न. प. ला -विश्व हिंदू परिषद व बजरंग दल ची मागणी

 


मलकापूर  प्रतिनिधि 

  मलकापूर शहरातील श्री सूर्यमुखी मोठा हनुमान  मंदिरा समोरल सरकारी मार्गावर  एक अज्ञात व्यक्तीचे अतिक्रमण चा प्रयत्न सुरु आहे. सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन मा.मुख्याधिकारी नगरपरिषद मलकापूर यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.

सदर निवेदनात नमूद केले आहे की श्री सूर्यमुखी मोठा हनुमान मंदिरासमोर एका अज्ञात व्यक्तीने अतिक्रमण सुरु केले आहे. ज्या मार्गावर हे मंदिर आहे. हा मार्ग सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभा  यात्रा मार्ग व पोळा उत्सव मार्ग आहेत. तसेच अतिक्रमित जागा पुरातत्व विभागाच्या जागेला लागून सुद्धा आहे.भविष्यात या अतिक्रमनाचा   त्रास मंदिरातील दर्शनास येणारे भाविक व सार्वजनिक उत्सव यांना होऊ शकतो. याकरिता नगर  पालिका प्रशासन दखल घेऊन  सदर अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे.

 यावेळी बजरंग दलाचे संयोजक दीपक कपले,  विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री  श्रीकृष्ण तायडे,विश्व हिंदू परिषद  तालुका अध्यक्ष संमती जैन, विश्व हिंदू परिषद शहर प्रमुख ऍड. प्रशांत कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद नगर मंत्री श्यामसिंह हजारी, विहिंप प्रखंड उप अध्यक्ष बबलू बैरागी, विहिप शहर उपाध्यक्ष अमोल टप, खंड प्रमुख रवि जवरे , दीपक चवरे विशाल दवे, ,राजकुमार वानखेडे  उपस्थित होते.

Powered by Blogger.