Breaking News
recent

आल्टो मधुन ४५ किलो गांजा जप्त



मलकापूर / प्रतिनिधी: नागेश सुरंगे


        मलकापूर लगत असलेल्या कुरा काकोड येथुन धाड गावाकडे जाणारा ४५ किलो गांजा घेऊन जात असलेल्या अल्टो गाडी सह आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश  आले. मलकापूर येथील कुन्हा काकोडा वरुन बऱ्याच वेळा अवैध रित्या गांजा, गुटखा, अवैध रित्या वाहतूक  किली जात असल्याचे बराच वेळ निदर्शनास आले आहे. त्याच प्रमाणे पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरा काकोडा येथुन धाड गावाकडे जात असताना राष्ट्रीय मार्ग ६ बेलाड फाटा नजीक मोठ्या शिताफीने गांजा घेऊन जात असलेल्या अल्टो गाडी सह आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार काई ४५ किलो गांजा अल्टो गाडी असे अंदाजे ५ ते ६ लाख चा मुद्दा माल असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. वृत्त लिहे पर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती

Powered by Blogger.